शतं जीवतु नीरोगो राष्ट्रभक्तो यशोयुतः।
शक्तिबुद्धिसमायुक्तो जनसेवाव्रती महान्।।१।।
शक्तिबुद्धिसमायुक्तो जनसेवाव्रती महान्।।१।।
तू शंभर वर्षे नीरोगी जीवन जगावेस. राष्ट्रभक्त व्हावेस आणि यशस्वी व्हावेस. शक्ती आणि बुद्धी यांनी युक्त होऊन मोठा जनसेवाव्रती बनावेस.
जन्मदिनमिदं ते स्यादामोदतुष्टिकारणम्।
विद्या कीर्तिर्धनं भक्ति: दिने दिने प्रवर्धताम्।।२।।
हा जन्मदिवस तुझ्यासाठी आनंद आणि संतोष देणारा होवो. तुझे ज्ञान, कीर्ती, धन आणि भक्ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो.
यथा रामस्य कृष्णस्य यशोगाथा प्रवर्तते।
तथा भद्रं परं चैव प्रवर्ततामखण्डितम्।।३।।
राम आणि कृष्ण यांची यशोगाथा जशी अखण्डितपणे प्रचलित आहे त्याप्रमाणे तुझे श्रेष्ठ असे कल्याण अखंडपणे होत राहो.
भवते/भवत्यै जन्मदिनस्य नैकाः शुभकामनाः।
.jpeg)