गुरुपञ्चकम्।

 

जीवमात्रे क्षमायुक्तः
ज्ञानदानं करोति यः।
व्यवहाराय मोक्षाय
स वै गुरुरिति स्मृतः।।१।।

जीवमात्राच्या बाबतीत क्षमाशील असणारा,जो व्यवहारसिद्धीसाठी किंवा मोक्षप्राप्तीसाठीही ज्ञान देतो, त्याला गुरू असे म्हणतात.

सर्वेषामुपकारित्वाद्-
गुरुः गुरुत्वमर्हति।
सम्मान्यः सर्वभूतेषु
किं भूतमधिकं ततः।।२।।

सर्वांवर उपकार करत असल्याने गुरू गुरुपणास पात्र होतात. ते सर्व जीवांमध्ये सन्मान्य आहेत. त्यांच्यापेक्षा कोणता जीव अधिक श्रेष्ठ असेल बरे? 

प्रसादः श्रीगुरोश्चैव
विभवाय भवेत्सदा।
अत एव गुरुर्ध्येयः
सुखमूलं च तत्परम्।।३।।

श्रीगुरूंची प्रसन्नता सर्व प्रकारच्या (ऐहिक आणि आध्यात्मिक) वैभवाला कारणीभूत होते.म्हणून गुरूंचे नेहमी ध्यान करावे कारण तेच सर्वसुखांचे श्रेष्ठ असे उगमस्थान आहे.

गुरुं विना भवेज्जीवः
नौरिव नाविकं विना।
निमज्जेदसहायश्च
संसृतिसागरे ध्रुवम्।।४।।

गुरुविना जीवाजी स्थिती नावाडी नसलेल्या नावेप्रमाणे होईल आणि असहायपणे तो नक्कीच या संसारसागरात बुडेल.

अहङ्कारं परित्यज्य
गुरोरङ्घ्रियुगे रतः।
तस्य भवेत्फलं सर्वं
वेदवेदान्तनिश्चितम्।।५।।

अहंकाराचा त्याग करून जो गुरूंच्या चरणयुगाच्या ठिकाणी रममाण होतो, त्याला वेद आणि वेदान्ताने निश्चित केलेले सर्वप्रकारचे फल प्राप्त होते.

फलश्रुतिः--
गुरुपञ्चकमेतद्वै
यः पठेद्भाविको जनः।
सायं प्रातर्दृढप्रीत्या
प्राप्नुयात्सर्वमङ्गलम्।।६।।

जो भाविक मनुष्य या स्तोत्राप्रति दृढ प्रीती धरून सकाळ संध्याकाळ या गुरुपंचकाचा पाठ करेल त्याला सर्व मंगलमय गोष्टी प्राप्त होतील.