बहुकालं वदामो हि।

  


बहुकालं वदामो हि
सर्वासु वाक्षु संस्कृतम्।
वेदवाग्बुधवागेषा
देववागिति निश्चितम्।।१।।

खरोखरच पुष्कळ काळापासून आपण 'संस्कृत सर्व भाषांमध्ये मुख्य आहे; ती वेदवाणी आणि ज्ञानी जनांची भाषा आहे, निश्चितपणे देववाणी आहे' इत्यादी म्हणत आहोत.


ज्ञानभाषा भवेदेषा

विश्वस्य भारतस्य च।

विश्वगुरुत्वलाभाय

साधनं बलवत्तरम्।।२।।


ही भाषा संपूर्ण भारताची ज्ञानभाषा झाली पाहिजे कारण भारताला विश्वगुरुत्वाचा लाभ होण्यासाठी हे अत्यंत बलशाली असे साधन आहे.


कार्यक्षेत्रेषु त्वप्यस्याः

व्यवहारो न दर्श्यते।

सारल्यं मधुमत्वं च

क्षमत्वमर्थगामिता।।३।।


तथापि सर्व कार्यक्षेत्रांमध्ये संस्कृतच्या साह्याने व्यवहार, तिची सरलता, माधुर्य , सामर्थ्य आणि मुख्य म्हणजे अर्थकारणाशी असलेला तिचा संबंध जोपर्यंत आपल्याकडून दाखविला जाणार नाही,


तावन्न पुनरुत्थानं

संस्कृतस्य परं भवेत्।

तदर्थं सङ्घदृष्ट्या च

यावन्न प्रयतामहे।।४।।


आणि जोपर्यंत आपण यासाठी संघदृष्ट्या प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत  संस्कृतचे उत्तम पुनरुत्थान होणार नाही.


सङ्गणकाय भाषेयं

युक्तेति तु चिरश्रुतिः।

किमर्थं न कृतैषोक्तिः

सफला ज्ञानिभिस्तथा।।५।।


ही भाषा संगणकासाठी उपयुक्त आहे इत्यादी आपण दीर्घकाळ ऐकत आहोत. पण ही उक्ती बुद्धिमंतांनी का बरं तशी अजून सफल करून दाखविलेली नाही?


जन्मभूस्त्वीक्षमाणासौ

साधयामः कदा वयम्।

अतो यत्नो भवेद्भूयान्

सूक्ष्मदृष्ट्या यथाक्रमम्।।६।।


या सर्व गोष्टी आपण कधी साधणार म्हणून आपली मातृभूमी प्रतीक्षा करत आहे. म्हणून आपल्याकडून सूक्ष्म दृष्टीने क्रमबद्ध आणि जोरदार प्रयत्न व्हायला हवेत, नाही का?