या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ।।१।।
◆ शब्दार्थ--
• या = जी who • कुन्द=कुन्दफुले, white jasmine flower • इन्दु = चन्द्र moon • तुषार= हिमकण, frost, snowfakes • हार = मोत्यांची माळ, pearl-garland • धवल = शुभ्र white • कुन्देन्दुतुषारहारधवला = कुन्दफुले, चंद्र, हिमकण किंवा मोत्यांच्या हाराप्रमाणे गौरवर्णाची असणारी one who is white-complexioned like the white jasmine flowers, the moon, snowflakes or a pearl-garland • वस्त्र = garment • आवृत = आच्छादलेली covered • शुभ्रवस्त्रावृता = शुभ्र वस्त्रे ल्यालेली, one who is wearing white garments • वीणा = the Veena • वर = श्रेष्ठ, exquisite • दण्ड = दांडी, arm • मण्डित=अलंकृत , adorned • कर = हात, hand
• वीणावरदण्डमण्डितकरा = वीणेच्या श्रेष्ठ दांडीने जिचा हात अलंकृत केला आहे अशी , one whose hand is adorned by the exquisite arm of the Veena • पद्म =कमळ, lotus • आसन= seat • श्वेतपद्मासना =one who is seated on a white lotus • ब्रह्मा = ब्रह्मदेव , the Creator God-- Brahma • अच्युत = the Sustainer God--Vishnu • शङ्कर = the Destroyer God--Shankar • प्रभृति = इत्यादी, etc • ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः = ब्रह्मा, विष्णू, शंकर इत्यादींनी, By gods like Brahma, Vishnu and Shankar • देवैः =देवांनी, by gods • सदा =नेहमी, always • वन्दिता = नमन केलेली, bowed down to /saluted • सा= ती, she • माम् = मला, me • पातु = रक्षण करो, may protect • भगवती= देवी, goddess • निःशेष = पूर्णतः, totally • जाड्य = बुद्धीचा मंदपणा, sluggishness of the intellect • अपहा = नष्ट करणारी , one who removes • निःशेषजाड्यापहा = बुद्धीचा मंदपणा पूर्णतः नष्ट करणारी , one who totally destroys the sluggishness of the intellect.
◆ मराठी अर्थ--
जिचा वर्ण कुंदफुले,चंद्र,हिमतुषार,मोत्यांचा हार यांच्याप्रमाणे गोरा आहे; जिने शुभ्र वस्त्रे परिधान केली आहेत; वीणेच्या श्रेष्ठ दांडीने जिचा हात सुशोभित केला आहे; जी शुभ्र कमळाच्या आसनावर विराजमान आहे; जिला ब्रह्मा, विष्णू ,शंकर इत्यादी देव नेहमी वंदन करत असतात अशी; बुद्धिमांद्य समूळ नष्ट करणारी भगवती सरस्वती माझे रक्षण करो.
◆ Meaning in English--
The Goddess Saraswati who is white- complexioned like the white jasmine flower, the moon, snowflakes or a pearl-garland ; is wearing white-coloured garments; whose hand is adorned by the exquisite arm of the Veena ; who is sitting on the throne of a white lotus; who is always bowed down to by gods like Brahma, Vishnu and Shankar ; who totally destroys the sluggishness of the intellect -- may the Goddess protect me.
शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाद्यां जगद्व्यापिनीं
वीणापुस्तकधारिणीमभयदां मोहान्धकारापहाम्।
हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् ।। २।।
◆ शब्दार्थ--
• शुक्ला = शुभ्रवर्णी, white-complexioned • ब्रह्म = जगाचे मूलकारण the root cause of the world विचारसार= विचारांचे सार , the gist of deliberations • परमा= उत्कृष्ट, exquisite • ब्रह्मविचारसारपरमा= ब्रह्मविचाराचे उत्कृष्ट सार असणारी, who is the excellent gist of the deliberations about Brahman • आद्या = सर्वात आधी विद्यमान असणारी one who is existent before everything • जगद्व्यापिनी = जगाला व्यापून असणारी pervading the entire world • वीणापुस्तकधारिणी = हातांमध्ये वीणा आणि पुस्तक धारण करणारी holding the Veena and book in her hands • अभयदा = अभय देणारी imparting freedom from fear • मोहान्धकार-अपहा= मोहरूपी अंधार नष्ट करणारी , despeler of the darkness of delusion • हस्ते =हातामध्ये , in hand • स्फाटिकमालिका = स्फटिकमण्यांची जपमाला, a string of crystal-beads • विदधती = धारण करणारी, holding • पद्मासने = कमलासनावरती on the throne of lotus flower • संस्थिता= स्थानापन्न, sitting • वन्दे = मी नमस्कार करतो I bow down • ताम् = तिला, her • परमेश्वरी= परमेश्वराची शक्ती, Consort of the Supreme Godhead • भगवती = Goddess • बुद्धिप्रदा = बुद्धिदायिनी ,giver of intelligence • शारदा = सरस्वती (सरस्वतीचे वर्णन करणारे सर्व शब्द श्लोकात द्वितीया विभक्तीत आहेत त्यामुळे यांच्या शेवटी अनुस्वार आहे. In the shloka all words describing Saraswati are in the second case . Thats why there is an _anusvara_ at their end)
◆ मराठी अर्थ--
शुभ्र वर्णाची , वेदान्तातील ब्रह्मविचाराचे उत्कृष्ट सार असणारी, विश्वाच्या आधी विद्यमान असणारी ,सर्व जग व्यापणारी , जिने हातात वीणा आणि पुस्तक धारण केले आहे अशी, अभय देणारी, मोहरूपी अंधाराचा नाश करणारी, हातामध्ये स्फटिकमाला धारण करणारी , पद्मासनामध्ये बसलेली, मानवाला बुद्धी प्रदान करणारी अशी जी भगवती सरस्वती शारदा , तिला मी वंदन करतो .
◆ Meaning in English--
I bow down to the Goddess Saraswati who is also called as Sharada ; who is white-complexioned ; who is the excellent gist of the Vedantic deliberations about Brahman; who is existent even before the world ; who pervades the entire universe ; who holds the Veena, and the book and the string of crystal-beads in her hands ; who imparts fearlessness ; who dispels the darkness of delusion ; who is the consort of the Supreme Godhead ; and who imparts intelligence.
